

Narasimha Jayanti 2026
sakal
Narasimha Jayanti 2026 Story, Significance, Puja Vidhi: नृसिंह जयंती हा भगवान विष्णूंच्या चौथ्या अवतार असलेल्या नृसिंहाचा जन्मदिन मानला जातो. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ही जयंती साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नरसिंहाची भक्तीभावाने पूजा केली तर आपल्या मनातील भीती आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे व्यक्तीमध्ये आध्यात्मिक शक्तीही वाढते. हा दिवस केवळ एका असुर आणि देव यांच्यातील युद्धकथेपुरता मर्यादित नसून, अढळ श्रद्धा आणि शेवटी सत्याचाच विजय होतो याची अमर साक्ष म्हणूनही ओळखला जातो. यंदा ही तिथी नेमकी कधी आहे, पूजा कशी करावी आणि यामागची मूळ कथा काय आहे, याची माहिती जाणून घ्या.