
Sakal
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते.
मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा.
माता कात्यायनीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील.
How to perfom Maa Katyayani Puja on Navratri: शारदीय नवरात्राचा सहावा दिवस हा माता दुर्गेच्या कात्यायनीच्या पूजेसाठी समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार माता कात्यायनीला सुवर्ण आभा आहे आणि तिचे फक्त दर्शन भक्ताला आनंद आणि सौभाग्य प्रदान करते. असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने नवरात्रात विहित विधींनुसार माता कात्यायनीची पूजा, जप, ध्यान आणि उपवास केला तर देवी तिच्यावर प्रसन्न होते आणि सर्व समस्या दूर करते.