

Navratri Day 4: Goddess Kushmanda Puja Vidhi, Significance & Mantras
esakal
Navratri Fourth Day: नवरात्रीत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नऊ दिवस विविध पद्धतीने उपासना केली जाते, म्हणूनच तिला 'नवदुर्गा' असे म्हटले जाते. शक्तीची ही उपासना मानवाला जीवनात सतत पुढे जाण्यासाठी आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा देते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस विशिष्ट देवीला समर्पित असतो, त्यापैकी चौथा दिवस हा माता कुष्मांडा देवीच्या पूजनासाठी अत्यंत विशेष मानला जातो.
सृष्टीची निर्मिती करणारी आदिशक्ती आणि आरोग्याचे वरदान देणारी माता कुष्मांडा हिच्या व्रताचरण, पूजन विधी, महत्त्व आणि मान्यतेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया-