

Navratri Day 5: Goddess Skandamata Puja Vidhi, Mantra & Significance
esakal
Skandamata Puja Vidhi: शारदीय नवरात्रोत्सवात दररोज आदिशक्ती दुर्गा मातेच्या विविध नऊ रूपांची अत्यंत श्रद्धाभावाने पूजा केली जाती. नवरात्रीचा प्रत्येक दिवस विशिष्ट देवीला आणि एका विशिष्ट ऊर्जेला समर्पित असतो. नवरात्रीचा पाचवा दिवस हा माता दुर्गेचे पाचवे रूप असलेल्या 'स्कंदमाता' देवीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रेम, वात्सल्य आणि समृद्धीचे प्रतीक असणारी स्कंदमाता आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी धार्मिक मान्यता आहे.