esakal | मुंबईत आजपासून नवरात्रीची धूम; ७४७ ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना | Navratri Festival
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri festival

मुंबईत आजपासून नवरात्रीची धूम; ७४७ ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

मुंबई : शक्ती, सृजन, तेज अन् निर्धाराचे प्रतीक असलेल्या देवीचा नवरात्रोत्सव (Navratri festival) आजपासून (गुरुवार) सुरू होत आहे. कोरोनाचे सावट (Corona pandemic), महागाईचा उच्चांक असला तरी भाविकांमध्ये गणेशोत्सवाप्रमाणेच उत्साह दिसून येत आहे. त्यानिमित्ताने घराघरांत आज घटस्थापना होणार असून, घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला साहित्य खरेदीसाठी (worship material) महिलांच्या गर्दीने दादर, लालबागमधील बाजारपेठा (dadar market) फुलून गेल्या होत्या. संपूर्ण मुंबईत जवळपास ठिकाणी ७४७ दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर, अनेक घरांमध्ये घट, कलश आणि छोट्या मूर्तीही विराजमान केल्या जाणार आहेत.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस हा उत्सव असतो, म्हणून त्यास नवरात्रोत्सव असे संबोधले जाते आणि १० व्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना, नवरात्रीचे व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते. घटस्थापनेलाच कलश स्थापना असे देखील म्हटले जाते. त्यामुळे, आजपासून सर्व महिला पुढचे ९ दिवस मनोभावे देवीची पूजाअर्चा करणार आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईत नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, यंदाही कोरोनाचे सावट कायम असून नवरात्रोत्सवही शांततेत साजरा केला जाणार असल्याचे मंडळ कार्यकर्त्यांनी सांगितले.

मुंबईतील बॉम्बे दुर्गा बारी समिती ९२ वर्षे मुंबईत शारदोत्सव (दुर्गा पूजा) साजरी करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या समितीने मूर्तीची स्थापना केली आणि यंदाही पुढचे पाच दिवस
पारंपरिक पूजा आणि आनंदाने भरलेल्या ५ दिवसांचा उत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे सर्व विधी जरी केल्या जाणार असल्या तरी भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.

७४७ मंडळांना परवानगी

मुंबईतील ७४७ ठिकाणी देवीचे आगमन होणार आहे. तर, २४ प्रभागांपैकी `जी दक्षिण`मध्ये सर्वाधिक ६३ देवींच्या मूर्तींची स्थापना केली जाणार आहे. त्यापाठोपाठ, डी प्रभागामध्ये ६० मूर्ती स्थापन होणार आहेत. दरम्यान, मुंबईतून १,३६५ मंडळांनी उत्सवाची परवानगी मागितली होती त्यातील ७४७ मंडळांना पालिकेने परवानगी दिली आहे.

loading image
go to top