

Saptashrungi Devi Mythological Story
sakal
MARKANDEYA RISHI AND SAPTASHRUNGI DEVI STORY: नवरात्र जवळ आली की महाराष्ट्रातील वातावरण भक्तिमय होते. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा, घटस्थापना, आरती, भजन-कीर्तन आणि उपवास अशा विविध पद्धतींनी हा उत्सव साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रातील शक्तिपीठांना या काळात मोठे धार्मिक महत्त्व प्राप्त होते. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरही नवरात्रीत हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. डोंगररांगांनी वेढलेल्या या पवित्र स्थळाची महती केवळ देवीच्या जागृत स्वरूपामुळेच नाही, तर तिच्याशी जोडलेल्या अनेक पौराणिक कथांमुळेही आहे.