Neem Karoli Baba : सुखी जीवन जगण्यासाठी या 4 गोष्टी जगापासून लपवा, नीम करोली बाबा सांगतात...

आपल्या चमत्कारामुळे जगभरात प्रसिद्ध असणारे नीम करोली बाबा यांनी सुखी जीवनाचा मूलमंत्र सांगितला आहे.
Neem Karoli Baba
Neem Karoli Babaesakal

Neem Karoli Baba Tips : कैंची धाम आश्रमातले नीम करोली बाबाना कोण ओळखत नाही. भारतासहीत देशात, विदेशात अनेक मान्यवर लोक बाबांविषयी श्रद्धा बाळगतात. त्यांना हनुमानाचा अवतार मानलं जातं. पण बाबा मात्र स्वतःला सामान्य माणूस समजत. म्हणूनच ते लोकांकडून नमस्कार पण करून घेत नसे. त्यांच्या चमत्काराच्या कथा आजही लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात.

नीम करोली बाबा यांचा जीवन प्रवास

उत्तर प्रदेशच्या अकबरपूर गावात १९००च्या सुमारास त्यांचा जन्म झाला होता. त्यांच नाव लक्ष्मी नारायण शर्मा होतं. वयाच्या ११ व्या वर्षी एका ब्राह्मण परिवारातल्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. साधू जीवन जगण्यासाठी त्यांनी घर, संसाराचा त्याग केला. पण नंतर वडिलांच्या आग्रहास्तव परत आले. त्यानंतर त्यांना २ मुलं आणि १ मुलगी झाली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कैंची धाममध्ये राहीले.

बाबांचे चमत्कार आणि उपदेश अनेकांना जीवनाची दिशा दाखवणारे ठरले आहेत. त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या इतर कोणाशीही शेअर करू नये. याचे पालन केले तर तुम्ही सुखी जीवन जगू शकतात.

Neem Karoli Baba
Neem Karoli Baba : विराट कोहलीच्या गुरुंचे 'हे' उपाय करा, कधीच जाणवणार नाही पैशांची कमी

कोणाला सांगू नये अशा कोणत्या गोष्टी आहेत?

भूतकाळातील गोष्टी - बाबा म्हणतात की, प्रत्येकाचा चांगला किंवा वाईट भूतकाळ असतो. पण त्याविषयी चुकूनही कोणाजवळ बोलू नये. विशेषतः जर भूतकाळात काही वाईट घडलं असेल तर अजिबात शेअर करू नये. कारण अशा गोष्टींच्या आधारावर लोक तुम्हाला हीणवू किंवा अडचणीत आणू शकतात.

आपली शक्तीस्थानं किंवा विकनेस - बाबा सांगतात की, आपली शक्तीस्थान किंवा विकपाइंट्स कोणाला सांगू नये. असं केल्याने तुमचे शत्रू किंवा विरोधी तुमच्यावर हावी होऊ शकतात.

Neem Karoli Baba
Sant Gadge Baba Birth Anniversary : निरक्षर असलेल्या गाडगे बाबांचे नाव कसे आले अमरावती विद्यापीठाला?

दान-पुण्य - तुम्ही कोणाला आणि किती दान पुण्य केले आहे ते कधीही कोणालाही सांगू नये. कारण या दानाचे गाजावाजा केल्याने त्याचं पुण्य कमी होतं असं मानलं जाते. शिवाय स्वतःचंच गुणगान करणाऱ्याच्या आयुष्यात नकारात्मकता वाढू लागते.

उत्पन्न - बाबा म्हणतात कोणी कितीही सख्खा असला तरी आपलं उत्पन्न सांगू नये. तुमचं उत्पन्न किती यावरून लोक तुम्हाला जज करू लागतात. शिवाय लोकांची वाईट नजर तुमच्या पैशांवर राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com