Nirjala Ekadashi dos and don’tsSakal
संस्कृती
Nirjala Ekadashi dos and don’ts: उद्या निर्जला एकादशी, 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...
Ekadashi fasting: निर्जला एकादशी ६ जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही गोष्टी पाळल्यास शुभ फळ मिळते. पण पुढील चुका केल्यास अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
Nirjala Ekadashi 2025: हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण एकादशी मानला जातो. यंदा निर्जला एकादशी 6 जून 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला येणारा हा व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे.
निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व 24 एकादशींचे फळ मिळते. ज्यामुळे भक्तांना सुख, समृद्धी आणि मोक्ष मिळतो, असं मानलं जातं. हे व्रत पाणी आणि अन्नाशिवाय पाळले जाते, म्हणूनच याला वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हटले जाते. या दिवशी काय करावे आणि काय करु नये हे जाणून घेऊया.