

Nirjala ekadashi 2026 date and time
Sakal
हिंदू धर्मात एकादशी व्रतांना खास महत्त्व आहे. त्यातही वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशींपैकी निर्जला एकादशीला सर्वात महत्त्वाची आणि पुण्यदायी एकादशी मानले जाते. या दिवशी काहीही न खाण्यासोबतच व्रत करणारे व्यक्ती पाणी सुद्धा पित नाहीत म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीचं व्रत केलं तर वर्षभरातल्या सगळ्याच २४ एकादशींचे पुण्य मिळतं.