

Numerology: 4 Birth Dates That Never Fear Their Boss or Authority
esakal
Numerology Secrets: प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात आत्मविश्वास असणे उत्तम मानले जाते. पण, तोच आत्मविश्वास जेव्हा वेळेप्रसंगानुसार अतिआत्मविश्वासात बदलतो किंवा नको तिथे दाखवला जातो, तेव्हा तो अडचणीचा ठरू शकतो. आत्मविश्वासातील हीच सूक्ष्म रेषा ओळखणे गरजेचे असते. अंकशास्त्रानुसार (Numerology), काही विशिष्ट जन्मतारखांचे लोक अत्यंत निर्भय, स्पष्टवक्ते आणि बेधडक प्रवृत्तीचे असतात.
कामाच्या ठिकाणी किंवा दैनंदिन आयुष्यात एखादी गोष्ट चुकीची वाटल्यास, हे लोक परिणामांची अजिबात पर्वा करत नाहीत. समोर बॉस असो, वरिष्ठ असो वा कोणताही मोठा अधिकारी, हे लोक थेट त्यांच्याशी दोन हात करायला मागे-पुढे पाहत नाहीत. लोकांच्या दृष्टीने हे वागणे अनेकदा उद्धटपणाचे किंवा भांडकुदळपणाचे वाटू शकते, पण मूळात हा त्यांचा जन्मजात स्पष्टवक्तेपणा असतो. अंकशास्त्रानुसार असे मूलांक कोणते आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.