

Numerology: Girls Born on These 4 Dates Bring Luck to Father and Husband
esakal
Numerology Secrets: अंकशास्त्रानुसार (Numerology) व्यक्तीच्या जन्मतारखेचा त्याच्या स्वभावावर, भविष्यावर आणि त्याच्याशी जोडलेल्या लोकांच्या आयुष्यावर खोल प्रभाव पडतो. जन्मतारखेवरून ठरणाऱ्या मूलांकावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे असेल, हे स्पष्ट होते. अंकशास्त्रातील विशेष दाव्यानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुली आपल्या कुटुंबासाठी, विशेषतः स्वतःचे वडील आणि पतीसाठी अत्यंत नशीबवान मानल्या जातात.
या मुली जिथे राहतात तिथे सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि आर्थिक सुबत्ता कायम राहते. माहेर असो वा सासर, त्यांच्या उपस्थितीने घरामध्ये समृद्धी आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडतात, असे मानले जाते.