

Numerology: Why These Birth Numbers Prefer Me-Time Over Constant Clinginess
esakal
Relationship Numerology: प्रत्येक नात्यामध्ये प्रेम, एकमेकांवर विश्वास आणि समज असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्पेस असणे देखील गरजेचे मानले जाते. काही लोकांना आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडतो, तर काही असे असतात जे नात्यात असूनही स्वतःच्या स्वतंत्र विश्वात रमणे पसंत करतात. त्यांना प्रेमाची गरज असते, पण नातेसंबंधात कोणतीही रोक-टोक किंवा सतत जाब विचारलेला अजिबात आवडत नाही.
अंकशास्त्रानुसार (Numerology), काही विशिष्ट मूलांक असलेले लोक स्वतःच्या स्वातंत्र्याशी तडजोड करत नाहीत. त्यांना नेमकी कोणती स्पेस हवी असते आणि त्यामागचे ज्योतिषीय कारण काय आहे, हे सविस्तर जाणून घेऊया.