

Numerology Stalking Ex Online- These 3 Birth Dates Find It Hardest to Forget Their Ex-Partner
esakal
Numerology Predictions: प्रेम आणि ब्रेकअप हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील टप्पा असतो. ब्रेकअपनंतर काही लोक काही दिवसांतच आपल्या आयुष्यात पुढे निघून जातात ('मूव्ह ऑन' करतात). पण, काही व्यक्ती महिने किंवा वर्षांनंतरही आपल्या आधीच्या जोडीदाराच्या (Ex-Partner) आठवणींतून बाहेर पडू शकत नाहीत. अशा व्यक्ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या एक्सच्या प्रोफाईलवर, फोटो आणि स्टेटसवर लपून लक्ष ठेवताना दिसतात.
अंकशास्त्रानुसार (Numerology), एखाद्या व्यक्तीच्या भावनांवर ताबा न राहणे किंवा ब्रेकअपनंतर सहजासहजी पुढे न जाणे, याचा थेट संबंध त्यांच्या जन्मपत्रिकेतील मूलांकाशी (Mulank) असतो. विशिष्ट जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी मूव्ह ऑन करणे अत्यंत कठीण मानले जाते. जाणून घेऊयात कोणत्या ३ मूलांकांच्या लोकांचा हा स्वभाव असतो-