

NUMEROLOGY WHICH MULANK PEOPLE DO NOT SHOW OFF THEIR WEALTH
esakal
NUMEROLOGY WHICH MULANK PEOPLE DO NOT SHOW OFF THEIR WEALTH: प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. काही लोकांकडे पैसा, चांगलं घर आणि सुख-सुविधा असल्या की त्यांना ते इतरांना दाखवायला आवडतं. पण सगळेच लोक असे नसतात. काही जणांकडे कितीही पैसा असला तरी ते अगदी साधं राहतात आणि आपल्या आयुष्याचा जास्त गाजावाजा करत नाहीत.
अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक काढला जातो. काही मूलांकांच्या लोकांचा स्वभाव साधा आणि जमिनीवर पाय ठेवून राहणारा असतो, असं मानलं जातं. त्यांना श्रीमंती दाखवण्यापेक्षा शांतपणे आणि आपल्या पद्धतीने आयुष्य जगणं जास्त आवडतं. जाणून घेऊया असे कोणते ३ मूलांक आहेत.