
flower for Hanuman ji: हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीचा साजरी केली जाते. हनुमान भक्त हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. यंदा १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार या पवित्र दिवशी, आई अंजनी आणि वानर राजा केसरी यांच्या पोटी शूर बजरंगबलीचा जन्म झाला. म्हणून, हा दिवस हनुमानजींची जयंती म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त केवळ बजरंगबलीच नव्हे तर भगवान श्रीराम आणि माता सीतेचीही पूजा करतात. श्रीरामांशिवाय हनुमानजींची पूजा अपूर्ण आहे असं मानलं जातं. भगवान हनुमानाला कोणतं फुल अर्पण करावं हे जाणून घेऊया.