
प्रयागराज : कुंभमेळ्यात दाखल झालेल्या भाविकांनी माघ पौर्णिमेनिमित्त बुधवारी पहाटेपासूनच संगमावर गर्दी केली. दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल १.६० कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: लखनौ येथून प्रयागराजच्या स्थितीवर लक्ष ठेऊन होते.