
प्रयागराज : महाकुंभमेळा आता शेवटच्या टप्प्यात आला असून आज चाळीसाव्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत ८४.४१ लाख भाविकांनी संगमात स्नान केले. आतापर्यंत एकूण ५८.८७ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. प्रयागराज येथे प्रवेशद्वारापासून ते शहरातील मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी उसळली आहे. पाचशे मीटरपर्यंत अंतर जाण्यासाठी सुमारे दोन तासांचा कालावधी लागत आहे.