Padmini Ekadashi 2023
Padmini Ekadashi 2023esakal

Padmini Ekadashi 2023: अधिक मासातील पहिली एकादशी व्रताचे महत्त्व, मुहूर्त आणि पूजाविधी

एकादशी व्रत केल्याने शरीर, मन आणि धनाचे सर्व त्रास दूर होतात.

Padmini Ekadashi 2023 : पुरुषोत्तम महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. तीन वर्षांतून एकदा ही एकादशी येते. पुरुषोत्तम महिन्यातील एकादशीला कमला एकादशी आणि पद्मिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. हे एकादशी व्रत केल्याने शरीर, मन आणि धनाचे सर्व त्रास दूर होतात. 

एकादशीचे व्रत केल्याने माणसाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच पितरांनाही मोक्ष होतो असे म्हणतात. तसेच हे व्रत पाळल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. आजच्या एकादशीला पद्मिनी एकादशी असं म्हणतात. ही तीन वर्षांनंतर आली आहे. तर आज ब्रह्म योग आहे त्यामुळे जवळपास 19 वर्षांनंतर ब्रह्म योगावर ही एकादशी आली आहे. श्रावण अधिक मासातील ही एकादशीला कमला असंही म्हणतात. 

कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी 2023 आज शनिवारी हा शुभ योग आहे. ब्रह्म नावाचा शुभ योग सकाळी 09:34 पर्यंत राहील. यानंतर इंद्राच्या नावाचा शुभ योग दिवसभर राहील. त्यासोबत सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्राचा संयोगामुळे लक्ष्मी नारायण नावाचा शुभ योग तयार झाला आहे. लक्ष्मी-नारायण योगातील कमला एकादशीचा योगायोग अतिशय शुभ आहे. 

Padmini Ekadashi 2023
Adhik Maas 2023: छत्रपती संभाजीनगर मध्ये गाजतीय चक्क 'धोंडा स्पेशल थाळी', काय आहे स्पेशल ?

पद्मिनी एकादशी मुहूर्त वेळा

सकाळी 07:38 ते 09:16

दुपारी 12:07 ते 12:59 

दुपारी 12:33 ते 02:11

दुपारी 03:50 ते 05:28 

Padmini Ekadashi 2023
Adhik Mahina 2023: धोंडाच्या महिन्यात जावयाला चांदीचे वाण का देतात? 

पद्मिनी एकादशी पारायण दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जुलै रविवारी पाळायचं आहे. यासाठी शुभ वेळ सकाळी 06:00 ते 08:37 पर्यंत असणार आहे. पारणापूर्वी ब्राह्मणांना भोजन आणि दान करा. तुम्हाला शक्य नसेल तर पीठ, डाळी, तांदूळ, तूप इत्यादी कच्च्या अन्नपदार्थांचं दान करा.

Padmini Ekadashi 2023
Adhik Mahina 2023: अधिक महिन्यात का वाचली जाते ठिकठिकाणी पोथी?

पद्मिनी एकादशीचे व्रत कसे करावे?

सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत आणि उपासना करून शुभ मुहूर्तावर पूजा करावी.नंतर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो घेऊन ते एका ताटावर ठेवावा. सर्वप्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावाव देवाला फुलांचा हार अर्पण करावा.यानंतर कुमकुमचा तिलक करून गंध, रोळी, अबीर, गुलाल, पान, फुलं, तांदूळ इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करावी. तुमच्या इच्छेनुसार देवाला भोग अर्पण करावा सोबतच तुळशीची पानं नक्की अर्पण करावे. आता आरती करून भाविकांमध्ये प्रसादाचं वाटप करावि आणि दिवसभर उपवास धरावा. एकादशी व्रताच्या रात्री झोपण्याऐवजी भगवान विष्णूचं मंत्र किंवा भजन-कीर्तन करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पारायण करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com