Panchang 11 Nov: आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

Panchang 11 Nov: आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाणार

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ११ नोव्हेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २० शके १९४४

आज सूर्योदय ०६:४२ वाजता होणार तर सूर्यास्त १७:५५ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही २०:११ आहे तर प्रात: संध्या ही स.०५:२६ ते स.०६:४२ दरम्यान होणार. आज सायं संध्या ही  १७:५५ ते १९:१३ दरम्यान होणार तर अपराण्हकाळ हा १३:२६ ते १५:४१ दरम्यान होणार.

आज प्रदोषकाळ हा १७:५५ ते २०:२८ दरम्यान होणार. आज निशीथ काळ हा २३:५३ ते २४:४४ दरम्यान होणार. आज राहु काळ हा १०:५४ ते १२:१८ दरम्यान होणार तर यमघंट काळ हा १५:०६ ते १६:३० दरम्यान होणार तर आज श्राद्धतिथी ही  द्वितीया श्राद्ध आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०३:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे. (daily panchang 11 November 2022)

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०८:०७ ते ०९:३१

  • अमृत मुहूर्त--  ०९:३१ ते १०:५४

  • विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६

पृथ्वीवर अग्निवास नाही. मंगळ मुखात आहुती आहे. शिववास १८:३३ प.क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी १८:३३ प. प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - कार्तिक

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - तृतीया(१८:३३ नं.चतुर्थी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - मृग(अहोरात्र)

  • योग - शिव(२१:४९ प.नं.सिद्ध)

  • करण - भद्रा(१८:३३ प.नं. बव)

  • चंद्र रास - वृषभ (१७:४३ नं.मिथुन)

  • सूर्य रास - तुळ

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १८:३३ प., संकष्टी चतुर्थी-पुणे चंद्रोदय रा.०८:११ आहे. या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे. गणेश सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणेशास मोदकांचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना सायं.०५:४३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

टॅग्स :Panchang