Panchang 21 December : बुधवारी हिरवे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

Panchang 21 December : बुधवारी हिरवे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक २१ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण ३० शके १९४४

आज सूर्योदय ०७:०५ वाजता तर सूर्यास्त १७:५९ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही २१:४१ आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:४७ ते स.०७:०५ दरम्यान होणार तर सायं संध्या ही  १७:५९ ते १९:१७ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:३७ ते १५:४८ दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १७:५९ ते २०:३७ दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २४:०६ ते २४:५८ दरम्यान आहे तर राहु काळ हा १२:३३ ते १३:५४ दरम्यान आहे. आज यमघंट काळ हा ०८:२८ ते ०९:४९रम्यान आहे तर आज श्राद्धतिथी त्रयोदशी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२७ ते दु.१२:३३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी वांगे खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १६:३८ ते १७:५९

  • अमृत मुहूर्त--  ०८:२८ ते ०९:४९

  • विजय मुहूर्त— १४:२१ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास नाही. केतु मुखात आहुती आहे. शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - हेमंत(सौर)

  • मास - मार्गशीर्ष

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - त्रयोदशी(१९:४३ प.नं. चतुर्दशी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - अनुराधा(२९:१६ प.नं. ज्येष्ठा)

  • योग - धृति(२०:१७ प.नं.शूल)

  • करण - गरज(०८:२६ प.नं.वणिज)

  • चंद्र रास - वृश्चिक

  • सूर्य रास - धनु

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १९:४३ ते ३०:५३, *प्रदोष, शिवरात्रि, सोपानदेव पु.ति(सासवड),प.पू श्री गुळवणी महाराज जयंती, सर्वार्थसिद्धियोग-अमृतसिद्धियोग २९:१६ प. आहे. या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

टॅग्स :Panchang