
Palakhi 2025 Tukaram life lessons: आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूतून दुपारी प्रस्थान होणार आहे. यंदाच्या या ३४० वा पालखी सोहळा असून उन, पाऊस कशाचाही विचार न करता आपल्या लाडक्या लिठ्ठलाच्या भेटीची ओढ घेऊन लाखो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. या पालखी सोहळ्या निमित्त तुकाराम महाराजांचे प्रेरणादायी विचार आज जाणून घेऊया. त्यांचे मौल्यवाण विचार आजही जीवनाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या अभंगांतून मिळणारे भक्ती, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि ईश्वरावरील श्रद्धेचे संदेश प्रत्येकाला प्रेरणा देतात. हा पालखी सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून, तुकोबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा सांस्कृतिक महोत्सव आहे. या शुभदिनी, भक्ती आणि अध्यात्माचा संगम सर्वांच्या मनात नवचैतन्य निर्माण करतो. संत तुकोबांचे अमर विचार जीवनात सकारात्मकता आणली. चला तर मग जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार कोणते आहेत.