Pitru Paksha 2023 : पितृपक्षाच्या काळात करा ‘या’ वस्तूंचे दान; त्यामागे आहे महत्वाचे कारण

पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात त्यांची पूजा केली जाते.
Pitru Paksha 2023
Pitru Paksha 2023esakal
Updated on: 

Pitru Paksha 2023 : पितृपक्ष यंदा भाद्रपद महिन्याच्या पोर्णिमेपासून अर्थात २९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. हा पितृपक्ष अश्विनी कृष्ण पक्षाच्या अमावस्येला म्हणजेत १४ ऑक्टोबरला समाप्त होणार आहे.

पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात त्यांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात पिंडदानाला विशेष महत्व आहे. पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी पिंडदानाचा विधी केला जातो.

पितृपक्षात पिंडदानासोबतच इतर काही वस्तूंचे दान करणे देखील महत्वाचे आहे.  जर तुम्ही तिळाचे दान या काळात केले असेल तर ते अतिशय महत्वाचे मानले जाते. पितृपक्षाच्या काळात तिळासोबत इतर काही गोष्टींचे दान करणे देखील महत्वाचे मानले जाते. तिळासोबत इतर कोणत्या गोष्टींचे दान करावे ? याबद्दल जाणून घेऊयात.

पितृपक्षात या वस्तूंचे करा दान

तूप

श्राद्धाच्या वेळी एका भांड्यात गायीचे तूप दान करणे हे कुटुंबासाठी शुभ मानले जाते.

धान्य

पितृपक्षाच्या काळात अन्नदानाला ही विशेष महत्व आहे. या अन्नदानामध्ये गहू आणि तांदूळ दान करणे शुभ मानले जाते. हे दान जर मनापासून आणि निश्चयाने केले तर अपेक्षित फळ मिळते.

वस्त्रदान

या काळात वस्त्रांचे दान करणे देखील शुभ मानले जाते. वस्त्रांमध्ये धोतर आणि दुपट्ट्यासह दोन कपड्यांचे दान करणे महत्त्वाचे आहे. हे कपडे नवीन आणि स्वच्छ असावेत.

Pitru Paksha 2023
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात कावळ्याला एवढं महत्व का? त्यामागे आहे महत्वाचं कारण

चांदीचे दान

पितृपक्षाच्या काळात चांदीच्या वस्तूंचे दान करणे महत्वाचे आहे. पितरांचे आशिर्वाद आणि समाधानासाठी चांदीच्या वस्तूंचे दान करणे हे प्रभावशाली मानले जाते.

गुळ

तिळासोबत गुळाचे दान करणे देखील शुभ मानले जाते. गुळाचे दान केल्याने घरातील कलह आणि दारिद्र्य नष्ट होते आणि सूखाची प्राप्ती होते.

Pitru Paksha 2023
Pitru Paksha 2023: पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये? सर्व महत्वाचे नियम जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

badrinath dham yatra record pitru paksh
Pitru Paksha 2026 What to Do If a Crow Doesn't Eat the Offering
Pitru Paksha 2026 Origin & History of the Shraddha Tradition
Pitru Paksha 2026 Vastu Rules Importance and Right Direction to Light Deepak in Evening 
Marathi News Esakal
www.esakal.com