
पितृ पक्ष 2025 मध्ये पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी योग्य दिशा निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या दिशेने लावलेले फोटो कुटुंबासाठी समस्या निर्माण करू शकतात, तर योग्य दिशेने लावलेले फोटो आशीर्वाद देतात.
Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात पितृपक्षाला खुप महत्व आहे. यंदा ७ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे. या काळात पूर्वजांची पूजा आणि श्राद्ध करण्याला खुप महत्व आहे. तसे कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर त्याचा फोटो श्रद्धेने लावला जातो. असं मानलं जातं की पूर्वजांचा फोटो घरी ठेवल्याने पूर्वज कुटुंबातील सदस्यांवर आशीर्वाद वर्षाव करतात. परंतु चुकीच्या दिशेने लावलेले फोटो देखील समस्या निर्माण करू शकते. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.