
Pitru Paksha 2025 start date 6 or 7 September: हिंदू धर्मात पितृपक्षाला खुप महत्व असते. यालाच श्राद्ध देखील म्हणतात. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. असं मानलं जातं की पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद देतात. हा त्यांच्या आत्म्यांना मुक्त करण्याचा आणि त्यांच्याबद्दल आदर दाखवण्याचा काळ आहे. या वर्षी पितृपक्ष कधी सुरू होईल याबद्दल लोकांच्या मनात थोडा गोंधळ आहे याबाबत आज सविस्तरपणे जाणून घेऊया.