

Can You Buy Navratri Puja Items on Sarva Pitri Amavasya?
esakal
Navratri Puja Shopping Rules: हिंदू पंचांगानुसार, पितृपक्ष पंधरवड्याचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या! या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म केले जाते. पितृपक्ष संपताच दुसऱ्या दिवसापासून आदिशक्तीच्या उपासनेचा सण म्हणजेच 'शारदीय नवरात्री'ला (Shardiya Navratri 2026) प्रारंभ होतो.
अशा स्थितीत नवरात्रीच्या तयारीसाठी देवीच्या पूजेचे साहित्य, घटस्थापनेचे सामान किंवा इतर खरेदी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करावी की करू नये, असा प्रश्न अनेक भाविकांच्या मनात उपस्थित होतो. या संदर्भात शास्त्रामध्ये आणि ज्योतिषात नेमके काय नियम सांगितले आहेत, ते सविस्तर जाणून घेऊयात.