

Pitru Paksha 2026: 5 Things You Should Avoid Buying According to Vastu
esakal
Pitru Paksha 2026 Guidelines: आपल्या दिवंगत पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी भाद्रपद पौर्णिमेनंतरचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. यंदा २७ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात होत असून १० ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्येने या पंधरवड्याची सांगता होईल. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, हा काळ उत्सवाचा किंवा नवीन गोष्टी उपभोगण्याचा नसून संयम, साधेपणा आणि दानाचा असतो. त्यामुळे या १५ दिवसांमध्ये काही विशेष वस्तूंची खरेदी करणे वर्ज्य मानले जाते.