

Vastu Tips for Pitru Paksha
sakal
VASTU TIPS FOR POSITIVE ENERGY AND PROSPERITY: गणेशोत्सव संपला की पितृपक्षाला सुरूवात होते. या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र हा कालावधी सुरू होण्यापूर्वी प्रत्येक घराघरात स्वच्छता केली जाते. पण हेच करताना जुन्या वस्तूंकडे तुमचं दुर्लक्ष होतं का? वास्तुशास्त्रानुसार पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी काही वस्तू बाहेर काढणं महत्त्वाचं असतं. असं मानलं जातं की या वस्तूंमुळे घरातल्या सकारात्मक वातावरणावर परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक प्रगतीतही अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी घराची स्वच्छता करताना या 4 वस्तू घरात असतील तर त्या काढून टाका, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.