

Pradosh Vratas in 2026
sakal
Three Pradosh Vrats in January 2026: नववर्षाची सुरुवात अनेकांसाठी नवे संकल्प, आनंद आणि नव्या आशांनी भरलेली असते. मात्र २०२६ हे वर्ष केवळ तारखांचा बदल नसून, अध्यात्मिकदृष्ट्या एक खास संदेश घेऊन येत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी भगवान शंकरांना अर्पित असलेलं प्रदोष व्रत निर्माण झालं. एवढंच नाही तर त्या एकाच महिन्यात तीन प्रदोष व्रतांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. असा योग फारच क्वचित पाहायला मिळतो आणि तो भक्तांसाठी खूप शुभ व लाभदायक मानला जातो. त्यामुळे नववर्षाची सुरुवातच शिवकृपेने झाली असून, भक्तांसाठी ही एक खास आणि पवित्र संधी ठरत आहे.