Mahakumbh 2025
Mahakumbh 2025 sakal

Mahakumbh 2025 : गर्दी नियमनासाठी एकात्मिक नियंत्रण कक्ष

Prayagraj : प्रयागराज येथील महाकुंभमध्ये रोज सत्तर-ऐंशी लाख भाविकांची हजेरी असते, तर पर्वणीच्या दिवशी हे प्रमाण कोटींच्या घरात पोहोचते. गर्दीचे योग्य नियमन आणि व्यवस्थापनासाठी एकात्मिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, तसेच तेथे येणाऱ्या अपप्रवृत्तीचा सामना करण्यासाठीही कठोर उपाययोजना केली आहेत.
Published on

प्रयागराज : दररोज सत्तर-ऐंशी लाखांवर भाविकांची हजेरी तर पर्वणीच्या दिवशी कोटीच्यावरभाविक महाकुंभनगरी प्रयागराजमध्ये हजेरी लावत आहेत. या गर्दीचे नियमन करणे, त्याचे व्यवस्थापन करणे आणि तेथे येणाऱ्या अपप्रवृत्ती शोधून काढण्याचे तसेच चेंगराचेंगरीसारखे प्रसंग टाळण्यासाठी येथे ‘इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर’ (एकात्मिक नियंत्रण कक्ष) कार्यरत आहे. त्यामुळे अनेक अपघात टाळता आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com