
प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये येत्या १३ रोजी प्रारंभ होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी नामांकित आखाड्यांपैकी काहींचे आगमन झाले आहे. सोमवारी आनंद आखाड्याचे दिमाखदार आगमन झाले. हत्ती, घोड्यांवर बसून नागा संत-महतांनी छावणीत प्रवेश केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ हे स्वतः सर्व तयारीवर लक्ष ठेवून आहेत.