
Radha Ashtami 2025: श्रावण महिन्यापासून भारतात वेगवेगळे सण सुरु होतात. हिंदू धर्मात श्रीकृष्णजन्मष्टमीला जसे महत्त्व आहे तसेच राधा अष्टमीला देखील महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी राधा जाते. मथुरा, बरसाना आणि वृंदावन मध्ये राधेचा जन्मदिवस असलेला हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यंदा राधा अष्टमी आज म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया राधा अष्टमीला काय केल्यास राधेचे आशीर्वाद कसे मिळतील.