Raksha Bandhan: औरंगाबादच्या चिमुकल्यांंनी दाळीपासून तयार केल्या इको-फ्रेण्डली राख्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eco friendly Rakhi

Raksha Bandhan 2022: औरंगाबादच्या चिमुकल्यांंनी दाळीपासून तयार केल्या इको-फ्रेण्डली राख्या..

खांद्यावर घेऊन आकाश अर्धे,

चला जाऊ या पुढे...

नव शतकाच्या पाठीवर लिहूया,

पर्यावरण रक्षणाचे धडे...

पर्यावरण रक्षण या मुल्याचे संस्कार बालमनावर रुजवण्यासाठी श्री गुजराती समाज विकास मंडळ संचालित,श्री गुजराती विद्या मंदिर औरंगाबाद येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा निर्धार केला आहे. इको-फ्रेण्डली राखी म्हणजे नैसर्गिक राखी तयार करणे आणि सामुहिक वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे आणि पर्यावरण संरक्षणाची जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी इको-फ्रेण्डली राखी तयार करणे आणि सामुहिक वृक्षारोपणांचा कार्यक्रम घेतला आहे. संस्कृती संवर्धनाबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश राखीच्या माध्यमातून दिला जातो, असे शाळेच्या मुख्याध्यापक सौ. भारती जोशी मॅडम यांनी सांगितले.

हेही वाचा: Rakshabandhan : यंदाच्या रक्षाबंधनाला स्वत: तयार करा या ५ राख्या

राखी हा हिदूंचा महत्त्वाचा सण. यामुळे सध्या बाजारात विविध व्हेरायटी असलेल्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. परंतु राख्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य नैसर्गिकदृष्ट्या हानिकारक आहे. त्यामुळे निसर्गातून सहज मिळणाऱ्या वस्तूंपासून इको- फ्रेण्डली राख्या तयार केल्या जातात. इको-फ्रेण्डली राखी जैविक विघटन होणाऱ्या वस्तूंपासून तयार केली जाते. ज्या वस्तू नाशिवंत आहेत, अशा नैसर्गिक वस्तूंचा वापर राखी तयार करण्यासाठी केला जातो. विविध प्रकारची पाने, फुले, चॉकलेट्‌सचे कागद, वेगवेगळ्या रंगीत डाळी, कापूस, कापडी तुकडे, पत्रिकांचे खरडे, वहिचे कव्हर अशा गोष्टी वापरून विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या आहे.

रक्षाबंधन हा भावा-बहिणींचा कौतुकाचा आणि उत्साहाचा दिवस. रेशमात गुंफलेले हे नातं म्हणजे भावाने बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचं दिलेलं वचनच आहे. या वचनाबरोबरच निसर्गाशीही आपले नाते घट्ट करण्यासाठी पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जोपासना ह्या त्रिसूत्रीतून इको-फ्रेण्डली राखी तयार करण्याची कल्पना साकारण्यात आलेली आहे, असे या संस्थेचे अध्यक्ष श्री राजेशभाई मेहता यांनी सांगितले. इको-फ्रेण्डली राखी म्हणजे नैसर्गिक साहित्य वापरून राखी तयार करण्याचा या उपक्रम श्री गुजराती विद्या मंदिर मधील इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सौ ममता सुलताने मॅडम ,श्री हरीश सुसर सर तसेच इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Raksha Bandhan 2022 School Childrens Made Eco Friendly Rakhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top