

When is Raksha Bandhan 2026? Know Date, Muhurat and Time
sakal
Raksha Bandhan 2026 Date, Muhurat and Time: श्रावण महिन्याची चाहूल लागली की महाराष्ट्रात सण-उत्सवांची रेलचेल सुरू होते. या सणांमध्ये प्रत्येकाला ज्याची सर्वाधिक उत्सुकता असते, तो म्हणजे रक्षाबंधन. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आणि आयुष्यभराच्या नात्याचं प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो.
या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. त्याबदल्यात भाऊ तिच्या रक्षणाची आणि कायम साथ देण्याची ग्वाही देतो. याच दिवशी महाराष्ट्रातील कोळी बांधव नारळी पौर्णिमा देखील मोठ्या उत्साहात साजरी करतात.