

Raksha Bandhan 2026 Muhurat
sakal
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचं नातं घट्ट करणारा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुखी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. हिंदू धर्मातील अनेक सण-उत्सवांप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशीही शुभ वेळेला महत्त्व दिलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार योग्य मुहूर्तावर राखी बांधल्यास हा विधी अधिक शुभ मानला जातो.
यंदा राखी बांधण्यासाठी तीन विशेष शुभ वेळा सांगण्यात येत आहेत. या वेळेत भावाला राखी बांधून तुम्ही रक्षाबंधनाचा विधी पूर्ण करू शकता.