
Raksha Bandhan 2025 Bhadra Kaal Timing and Significance: श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो, ज्याला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. श्रावण हा पवित्र महिना मानला जातो, त्यामुळे या महिन्यातील सर्व सण पवित्र मानले जातात. परंतु, या दिवशी भद्रा नावाचा एक विशिष्ट काळ असतो, जो अशुभ मानला जातो. त्यामुळे भद्राकाळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. म्हणूनच रक्षाबंधनाचा सण भद्राकाळ संपल्यानंतरच साजरा केला जातो.