Rakshabandhan 2022: पोस्टाने पाठवलेली राखी पोहचेल की नाही ही भीती वाटतेय? टपाल खात्याची खास स्कीम

रक्षाबंधनची लगबग आता पोस्ट ऑफिस मध्ये सुध्दा दिसू लागली आहे.
Rakshabandhan 2022
Rakshabandhan 2022Esakal

रक्षाबंधनची लगबग आता पोस्ट ऑफिस मध्ये सुध्दा दिसू लागली आहे.भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणच्या पोस्ट ऑफिसमध्ये रांगाच्या रांगा लागत आहे. रक्षाबंधनला बहिणीने भावाला पाठवलेली राखी रक्षाबंधनापूर्वी मिळावी या गोष्टी पोस्ट ऑफिस विशेष प्राधान्य देत आहे. भावासाठी बहिणी देशातच नव्हे तर परदेशातही राख्या पाठवत आहेत.पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे फारच कमी राख्या येत होत्या. मात्र यावर्षी पोस्टाने राख्या पाठवायची संख्या खूप वाढली आहे.

आताच्या या आधुनिक जगात राखी पाठवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरीही बहिणीचा भावाची राखी पोस्ट ऑफिसमधून राखी पाठवण्याचा ट्रेंड जास्तच आहे. आजही भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणी मोठ्या प्रमाणात पोस्ट ऑफिसवरच अवलंबून आहेत. त्यामुळेच रक्षाबंधनपूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची गर्दी वाढली आहे. यावरुन असे लक्षात येते की जग कितीही पुढे गेलं तरी लोक अजूनही सायकल चालवणाऱ्या पोस्टमन काकावर अवलंबून आहेत. कारण जिथे ऑनलाइन डिलिव्हरी करता येत नाही, अशा जागी पोस्ट ऑफिस डिलिव्हरी करत आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये दररोज मोठ्या संख्येने बहिणी वेगवेगळ्या गावे, शहरे आणि शहरांसाठी राख्या बुक करत आहेत. त्यामुळे पोस्टमन काकावर कामाचा मोठा ताण आला आहे.सध्या रक्षाबंधनमुळे टपाल विभाग राख्यांना प्राधान्य देत आहे.

दिल्लीतील एका पोस्ट ऑफिसमधून मिळालेल्या माहितीनुसार, सुरूवातीला राखी सामान्य मेल काउंटरवर बुक केल्या जातात. यानंतर या पॅकेट्समधून राखीचे पॅकेट वेगळे केले जाते. नंतर या राख्या निर्धारित जागी पाठवले जातात जेणेकरून या अगदी वेळेत पोहचवल्या जातील. पोस्ट ऑफिसमध्ये 15 रुपये किमतीचा वॉटरप्रूफ लिफाफा उपलब्ध आहे. याशिवाय लोक स्वतःची पाकिटेही आणतात. ही पाकिटे जेव्हा थोडी दाबून पाहिली तर त्यात राखी असल्याचे समजते.

Rakshabandhan 2022
Rakshabandhan 2022 : यंदा रक्षाबंधन नेमकं कधी आहे? 11 की 12 तारखेला?

बहुतेक वेळा, लोकांना बुकिंगच्या वेळी पॅकेटच्या वरच्या बाजुला राखी लिहिण्यास सांगितले जाते. प्रलंबित राख्यांचे ओझे सरतेशेवटी पडू नये म्हणून रोजच्या राख्या रोज पाठवण्याचा प्रयत्न पोस्ट ऑफिसकडून केला जात आहे.

या वर्षी राखी पाठवण्याची संख्या रेकॉर्ड ब्रेक झाली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही बहिणी राख्या पाठवत आहेत.पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे फारच कमी राख्या येत होत्या. मात्र यावेळी अनेक वर्षांचा विक्रम मोडला जात आहे. पोस्ट ऑफिस उघडताच भगिनी रांगा लावतात. सध्या, अनेक पोस्ट ऑफिसमध्ये एकूण पोस्टल बुकिंगपैकी 80 टक्क्यांपर्यंत फक्त राख्या आहेत.

रक्षाबंधनापूर्वी बहिणीची राखी भावापर्यंत पोहोचावी यासाठी टपाल विभाग वेगाने काम करत आहे. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सर्व डिलिव्हरी सेंटर्सना आदेश दिले आहेत की, सुट्टीच्या दिवशीही राखी त्यांच्या पत्त्यावर पोहोचवली जात आहे.

तसेच देश-विदेशात राख्या पोहोचवण्यासाठी वॉटरप्रूफ लिफाफे बनवण्यात आले आहेत. आम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राखी पाठवण्याची प्रक्रिया गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. सध्या टपाल कार्यालयात दररोज शेकडो राख्या येत आहेत.

राखी पाठवण्यासाठी रोजचे पार्सल तयार केले जातात. पार्सलवर राखी स्पेशल लिहिलेले असते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, लंडन, जर्मनी आणि कॅनडासह अनेक देशांमध्ये राख्या पाठवल्या जात आहेत. परदेशात राखी पाठवण्यासाठी दिल्ली इंटरनॅशनल मेल सेंटर आणि दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी राखी पाठवण्यासाठी टाऊन डिलिव्हरी आणि नॉन टाउन डिलिव्हरी असे शब्द दिल्लीहून इतर राज्यांमध्ये राख्या पाठवण्यासाठी वापरले जात आहेत. स्पीड पोस्ट, रजिस्ट्री आणि पार्सलच्या माध्यमातूनही राख्या पाठवल्या जात आहेत.

राखी लिफाफा 15 रुपयांना येतो. या लिफाफात ठेवलेल्या राख्या पावसात खराब होत नाहीत. या लिफाफावर आधीच गोंद चिटकवला आहे. तुम्हाला फक्त या गोंदावरील आवरण काढून ते चिकटवावे लागेल. तसेच राखीवर खास पोस्टकार्डही येतात. बहिणी आपल्या भावाला त्यावर सुरेख असा संदेश देखील लिहून पाठवू शकतात.या पोस्टकार्डची किंमत फक्त 50 पैसे आहे.

राखी पाठवताना कोणती काळजी घ्यावी?

टपाल खात्याकडून राखी पाठवताना कोणती काळजी घ्यावी हे सांगण्यात आले आहे.

1) पाकिटावर संपूर्ण पत्ता लिहावा. त्यात पिनकोड आणि लँडमार्क देखील लिहावा.

2) लिफाफ्यावर, तुमचा आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला पाठवायचे आहे त्याचा फोन नंबर लिहा.

3) तसेच, लिफाफ्यात पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com