Hanuman Original Name: बजरंगबली नव्हे तर ‘हे’ आहे भगवान मारुतीचं खरं नाव?, जाणुन घ्या नावाची कथा

रामभक्त असलेल्या भगवान मारुतीची अनेक नावं आहेत. संकटमोचक मारुती रायाची जवळपास १०८ नाव असल्याचं म्हंटलं जातं.
Hanuman Original Name
Hanuman Original NameEsakal

Hanuman Original Name: रामभक्त असलेल्या भगवान मारुतीची अनेक नावं आहेत. संकटमोचक मारुती रायाची जवळपास १०८ नाव असल्याचं म्हंटलं जातं. तशी तर मारुतीची Lord Maruti १२ नावं प्रचलित आहेत.

मग कुणी भक्त Devotees त्याला अंजनीपुत्र म्हणतं कुणी बजरंगबली तर कुणी हनुमान तसचं वायुपूत्र, शंकरसुवन, केसरीनंदन, कपीश्रेष्ठ, रामदूत अशा अनेक नावांनी भक्त त्याची उपासना करतात. Religious Marathi News What is Real Name of Bajarangbali

त्यातही बजरंगबली आणि हनुमान Lord Hanuman ही त्याची नावं जास्त प्रचलित आहेत. पण तुम्हाला माहित आहे का मारुतीचं बजरंगबली Bajarangbali हे नाव मुळात बजरंगबली नसून वज्रांगबाली असं आहे.

काळानुरुप जसे काही शब्दांचे उच्चार बदलत जातात त्याचप्रमाणे शब्दाचा अपभ्रंश होत म्हणा किंवा बोली भाषेतील उच्चारांमुळे पुढे हे नाव बजरंगबली असं झालं. 

काय सांगत पुराण?

पौराणिक कथेनुसार हनुमान हे वानरजाक केसरी आणि अंजनी यांचे पुत्र होते. केसरी यांना ऋषींनी अत्यंत बलशाली आणि सेवाभावी पुत्र होईल असा आशीर्वाद दिला होता.

त्यामुळेच त्यांचा पुत्र हनुमान याचं शरीर लोखंडासारखे कठीण आहे. त्यामुळे त्यांना वज्रांग म्हंटलं जाऊ लागलं. वज्रासारखं बळ असलेला म्हणून पुढे बली हा शब्द लागला आणि मारुतीरायाचं नाव वज्रांगबली असं झालं. Do you know lord bajrangbali real name

वज्र म्हणजेच हिऱ्याप्रमाणे कठिण अंग म्हणजे शरीर म्हणजेच वज्रांग. तर बळी म्हणजेच बळ असलेला. या अर्थी वज्रांगबली असं मारुतीचं नाव संबोधल जातं.मात्र पुढे काळानुसार भाषेतील उच्चारांमधील बदलांमुळे ते बजरंगबली म्हणून ओळखले जाऊ लागले.

हे देखिल वाचा-

Hanuman Original Name
Hanuman Jayanti : भगवान हनुमंताचे आयुवर्देतील संदर्भ माहितीये का?

मारुतीचं नाव हनुमान पडण्यामागे देखील एक कथा आहे. जेव्हा मारुती लहान होते तेव्हा त्यांनी सुर्याला पाहिलं.

सुर्याला एखादं फळ समजून मारुतीने सुर्य खाण्यासाठी सुर्याच्या दिशेने झेप घेतली. त्यांनी सुर्याला खाण्यासाठी तोंड उघडलं सुर्याची सर्व किरणं आपल्या पोटात घेतली त्यानंतर सुर्याला गिळून टाकलं. meaning of name bajrangbali

मारुतीने सुर्याला गिळल्यामुळे पृथ्वीतलावर अंधकार पसरला. सृष्टीचं चक्र बिघडलं. त्यामुळे सर्व देवता चिंतेत आले आणि ते मारुतीची समजूत काढू लागले. मात्र मारुती आपल्या हट्टावर ठाम होते ते कुणाचंही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे इंद्रदेव क्रोधीत झाले आणि त्यांनी त्यांच्या वज्राने मारुतीवर हल्ला केला. 

इंद्रदेवाने मारुच्या हनुवटीवर त्यांच्या वज्राने प्रहार केला. त्यामुळे मारुतीच्या हनुवटीला दुखापत झाली. त्यामुळेच त्यांना हनुमान असंही म्हंटलं जातं. त्यानंतर अनेक प्रयत्न आणि घडामोडींनंतर मारुतीने सुर्य देवतेला पोटाबाहेर काढलं. त्यानंतर देवतांनी मारुतीला अनेत शक्ती प्रदान केल्या. 

भारतात वेगवेगळ्या ठिकाणांनुसार अनेत देव देवतांच्या कथा आणि आख्यायिका बदलत जातात. असं असलं तरी भक्तांच्या मनात त्या देवता या कायमच पूजनीय असतात.

त्याच प्रमाणे वज्रांगबलीचं नाव जरी बजरंगबली झालं असलं किंवा कुणी त्याला मारुती कुणी हनुमान म्हणत असलं तरी भक्तांच्या मनात त्याची श्रद्धा आणि त्याचं स्थान कायमच पूजनीय राहिलं. 

bhagwan maruti original name in marathi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com