Remedies for Sunset : सूर्यास्तानंतर कधीही करू नका 'या' 5 गोष्टी

Remedies for Sunset : सूर्यास्तानंतर कधीही करू नका 'या' 5 गोष्टी
Updated on

Do not do this work in Sunset : आपल्यापैकी अनेकांच्या घरात संध्याकाळनंतर काय करावे काय करू नये यावर सूचना केल्या जातात. पण अनेकजण याकडे अंधश्रद्धा म्हणून दूर्लक्ष करतात.

पण, घरातील मोठी व्यक्ती सांगण्यामागे काहा ना काही अर्थ दडलेलाल असतो. या गोष्टींकडे लक्ष न दिल्याने अनेकदा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. आज आपण सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करणे निषिद्ध मानली जातात याबद्दल सांगणार आहोत.

संध्याकाळी झोपू नये

सूर्यास्त झाल्यावर चुकूनही झोपू नये. शास्त्रानुसार, संध्याकाळी सकाळ आणि संध्याकाळ दोन्हींचे मिलन होते. त्यामुळे यावेळेत झोपू नये. त्याऐवजी या काळात परमेश्वराचे स्मरण केल्याने शुभ फळ मिळते. संध्याकाळच्या वेळेत ज्या व्यक्ती झोपतात त्यांना रात्री झोप न लागण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. रात्री झोप न लागल्याने अनेक आजारही बळावू शकतात.

कोणालाही कर्ज देऊ नये

रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी या उधारीवर चालतात. मात्र, सूर्यास्तानंतर कुणालाही उधारीवर वस्तू देऊ नये. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते असे मानले जाते. संध्याकाळी उधार वस्तू दिल्याने घरामध्ये गरिबी येण्यास वेळ लागत नाही.

घरात ठेवू नये अंधार

सूर्यास्तानंतर वाईट शक्तींचा प्रभाव वाढू लागतो. अशा शक्ती अंधारात अधिक धोकादायक बनतात. सूर्यास्तानंतर घरात कधीही अंधार ठेवू नये. असे केल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढू शकतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर घरात लाईट आणि देवाजवळ न विसरता दिवा लावावा.

नखे कापणे टाळा

सूर्यास्तानंतर बोटांची नखे आणि डोक्याचे केस कापणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात पैशाच्या कमतरतेसह आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच कुटुंबात कलह वाढतो, त्यामुळे सूर्यास्तानंतर नखे कापणे टाळावे.

पाहुण्यांना जेवण द्या

सनातन संस्कृतीत घरी आलेल्या पाहुण्याला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. असे म्हटले जाते की, जर सूर्यास्तावेळी घरामध्ये कुणी पाहुणे आले तर, त्यांना कधीही उपाशी जाऊ देऊ नका. आलेल्या पाहुण्यांना जेवण करून पाठवल्याने ते घरातून बाहेर पडताना कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देऊन जातात. यामुळे कुटुंबाची भरभराट होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com