

Rishi Panchami Wild Vegetables Naivedya: Story & Health Benefits
esakal
Rishi Panchami Wild Vegetables Naivedya: ऋषिपंचमी म्हटली की महिलांचे कठोर व्रत, कश्यपादी सप्तऋषींची पूजा आणि पारंपरिक आहाराची विशेष आठवण होते. या व्रताशी जोडलेली एक अत्यंत महत्त्वाची लोकपरंपरा म्हणजे ‘नांगर न लागलेल्या जमिनीत उगवलेल्या रानभाज्या आणि कंदमुळांचा आहार’.
शेतीच्या नियमित मशागतीपासून दूर राहून, निसर्गाने स्वतःहून दिलेल्या वनस्पतींचा आहार घेण्याची ही परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने आणि निष्ठेने पाळली जाते. राज्यभरात ऋषिपंचमीनिमित्त पारंपरिक आहाराचे महत्त्व नव्याने अधोरेखित होते. या परंपरेमागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे खालीलप्रमाणे आहेत-