
रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शिवाची कृपा प्राप्त होते आणि आध्यात्मिक शांती मिळते.
रुद्राक्ष तणाव कमी करतो, एकाग्रता वाढवतो आणि मनाला शांत ठेवतो.
रुद्राक्ष रक्तदाब नियंत्रित करतो आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देतो.
रुद्राक्ष फळाच्या वरचे आवरण कडक असते. त्या आवरणावर नक्षीदार रेखा असते. खऱ्या रुद्राक्षाला आरपार छिद्र असते. त्या छिद्राला वाहिनी म्हणतात. रुद्राक्षाचा रंग हा तांबूस करडा असतो. अस्सल रुद्राक्षाची पारख करण्यासाठी त्याला पाण्याच्या ग्लासात टाकले असता, तो सरळ खाली जातो. रुद्राक्षामध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. टांगलेल्या स्थितीत ते दक्षिणोत्तर दिशा दाखवितात. रुद्राक्षाला कधीही कीड लागत नाही. रुद्राक्ष हातात धरला, तर स्पंदने जाणवतात. उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रूपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला पवित्र मानतात. कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी विशेष करून शंकरजी आणि भैरवजी, नवनाथांच्या जपासाठी रुद्राक्ष माळेचा वापर केला जातो.