

Ganesh Chaturthi Career Growth Remedies
sakal
Vikat Sankashti Chaturthi Remedies: हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. २०२६ मध्ये ही पावन तिथी ५ एप्रिलला येत आहे. ‘विकट’ म्हणजे कठीण प्रसंग किंवा मोठ्या अडचणी, तर ‘संकष्टी’ म्हणजे संकटांचा नाश करणारी. त्यामुळे या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील गंभीर अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे.
फक्त पूजा किंवा मंत्रजप पुरेसा नसून, बाप्पाला त्याच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्यास तो लवकर प्रसन्न होतो, असे मानले जाते. चला तर जाणून घेऊया, या दिवशी गणपती बाप्पाला काय अर्पण करावे.