गर्दी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन

चार हजार पोलिसांचा बंदोबस्त, वाहतुकीचे सुक्ष्म नियोजन, "लाईव्ह ट्रॅकींग'द्वारे घरबसल्या मिळणार वारीचा अनुभव
Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi police security Live tracking give you experience of wari sitting at home
Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi police security Live tracking give you experience of wari sitting at homesystem

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची सुरक्षितता व चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी खास पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबरोबरच कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावर्षी चार हजार पोलिसांबरोबरच राज्य राखीव पोलिस (एसआरपीएफ), बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखेतील पोलिसांचा बंदोबस्तात समावेश आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पालखी सोहळ्याचा बंदोबस्त, वाहतुकीतील बदल व विविध उपक्रमांबाबतची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त राजारामा स्वामी, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे उपस्थित होते. संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी बुधवारी (ता.22) पुण्यात आगमन होणार आहे. त्यानंतर दिवसांच्या मुक्कामानंतर शुक्रवारी सकाळी पालखी प्रस्थान ठेवणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून पालखी बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

असा आहे पोलिसांचा बंदोबस्त

  • अतिरीक्त पोलिस आयुक्त - 02

  • पोलिस उपायुक्त - 09

  • सहाय्यक पोलिस आयुक्त - 19

  • पोलिस निरीक्षक - 103

  • सहाय्यक पोलिस निरीक्षक - 307

  • पोलिस कर्मचारी - 3406

  • एसआरपीएफ - 01 कंपनी

  • गृहरक्षक दल - 600

चोरट्यांवर "क्राईम ब्रॅंच'ची करडी नजर

पालखीमध्ये दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे मोबाईल, पाकीट, सोनसाखळीसह अन्य मौल्यवान वस्तु चोरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. स्थानिक चोरट्यांसह परराज्यातील चोरट्यांच्या टोळ्याही पालखीमध्ये सक्रीय असतात. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखेची साध्या वेषातील पथके, दामिनी मार्शल गस्तीवर असणार आहेत.

पालखी मार्गाची पोलिस आयुक्त गुप्ता यांनी केली पाहणी

पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता पालखी मार्गाची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार, पुणे पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या खडकी, बोपोडी,बोपखेल पाटील इस्टेट, भवानी पेठ, नाना पेठ, महात्मा गांधी बसस्थानक (पुलगेट), वानवडी, हडपसर गाडीतळ या ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. तेथे पालख्यांची व भाविकांची सुरक्षितता, सोई-सुविधा व संभाव्या अडचणींची पाहणी करुन तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.

अनुभवा "लाईव्ह ट्रॅकींग'द्वारे पालखी सोहळा

पालखी मार्गाची इत्यंभुत माहिती नागरीकांसह वाहनचालकांना मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी diversion.punepolice.gov.in हे खास वेबपेज तयार केले आहे. नागरीकांना, वाहनचालकांना त्यांच्या मोबाईल, लॅपटॉपद्वारे एका क्‍लिकवर पालखी व बंद, सुरु असलेले रस्ते व वाहतुकीबाबतची अद्ययावत माहिती मिळणार आहे. या सुविधेमुळे भाविकांची गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.

"कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पालखी सोहळा होणार आहे. त्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालखी सोहळा व भाविकांची सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देऊन कडक बंदोबस्त ठेवला आहे. चोरीच्या घटना रोखण्याबरोबरच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बीडीडीएस, गुन्हे शाखेची पथके कार्यरत आहेत. याबरोबरच वाहतुकीत आवश्‍यक बदल करुन, पर्यायी रस्ते उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कोणत्याही संघटना, व्यक्तींकडून गैरप्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.'' अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.

  • वारकऱ्यांसाठी हेल्पलाईनची, ठिकठिकाणी मदतीसाठी बुथ

  • पोलिसांकडून दुचाकींद्वारे अंतर्गत रस्त्यांसह पालखी मार्गावर असणार "वॉच'

  • "वॉच टॉवर'द्वारे पोलिसांकडून पालखी सोहळ्यावर लक्ष्य

  • पालखी मार्गावरील गर्दी टाळण्क्षासाठी ठिकठिकाणी बॅरीकेडस्‌

  • चौक,रस्त्यांसह खासगी आस्थापनांकडील सीसीटीव्ही यंत्रणांचाही सुरक्षिततेसाठी होणार वापर

  • वाहतूक बदल व कोंडी टाळण्यासाठी वाहतुक पोलिस मोठ्या संख्येने रस्त्यावर

  • सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी फलक, घोषणा, बीडीडीएस पथकांकडून तपासणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com