पत्नीच्या शब्दांनी पालटले गोस्वामींचे आयुष्य

संत तुलसीदास जयंती विशेष
Sant Goswami Tulsidas Jayanti Special
Sant Goswami Tulsidas Jayanti Special

भारतीय संतपरंपरेने केवळ अध्यात्माचा मार्गच दाखविला नाही तर प्रत्यक्ष जीवनात व्यक्तीचा व्यवहार कसा असावा हे सांगितले. सार्वकालिक श्रेष्ठ संत गोस्वामी तुलसीदास यांनी ‘रामचरित मानस’चे हा सांस्कृतिक चैतन्य पसरविणारा अभूतपूर्व ग्रंथ लिहिला. त्यांची आज जयंती.

- डॉ. वेदप्रकाश मिश्रा

आयुष्यातील एखाद्या धक्कादायक प्रसंग संपूर्ण जीवनाचे ध्येय, मार्गच बदलतो. संत श्रेष्ठ गोस्वामी तुलसीदासही याला अपवाद नाहीत. अर्धांगिनीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेले तुलसीदास भयंकर पाऊस सुरू असतानाही रात्रीच्या समयास सासर गाठले. भार्या आपणाला पाहून आनंदित होईल, असा समज झालेल्या तुलसीदासांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले की त्यांच्या जीवनाने वेगळेच वळण घेतले. पत्नीसाठी व्याकूळ झालेला सामान्य व्यक्ती ते ‘रामचरित मानस’चे रयिचता असा संत तुलसीदासांच्या जीवनाचा प्रवास आहे. सामान्य वाटणाऱ्या आयुष्यातील घटनेमुळे जीवनात सर्वोच्च स्थानच नव्हे तर अमरत्व प्राप्त होऊ शकते, हेच संत तुलसीदास यांच्या जीवनातून आजच्या पिढीने शिकण्यासारखे अाहे.

काळ कुठलाही असो, सर्वश्रेष्ठपदापर्यंतचा मार्ग हा एका ठेचेमुळेच गाठता येते. संत तुलसीदासपर्यंतच्या प्रवासापूर्वी ते एक सामान्य व्यक्तीच होते. पत्नी रत्नावलीवर त्यांचे अपार प्रेम होते. सामान्य व्यक्तीप्रमाणे तेही पत्नीचा विरह सहन करू शकत नव्हते. अर्थात इतरांप्रमाणेच तेही भौतिक सुखामध्येच सुख शोधणारे होते. एके दिवशी त्यांची पत्नी माहेरी गेली. तुलसीदास एकाकी पडले. पत्नीच्या विरहाने व्याकूळ झाले. पत्नीविरहात सामान्य व्यक्ती ज्या स्थितीतून जातो त्याच स्थितीतून तुलसीदास जात होते.

पत्नीला भेटण्याच्या तीव्र इच्छेसह ते भर पावसात अंधाऱ्या रात्रीतून सासरला जायला निघाले. नदीला पूर असतानाही जबर इच्छाशक्तीच्या बळावर या संकटावर मात करून ते पत्नी रत्नावलीपर्यंत पोहोचले. पाऊस असतानाही केवळ भेटण्यासाठीची इच्छाशक्ती पाहून रत्नावली त्यांच्यावर चांगलीच रागावली. ‘अस्थि चर्म मय देह यह, ता सों ऐसी प्रिती, नेकु जो होती राम से, तो काहे भव-भीत’ हा दोहा म्हणत तुलसीदास यांच्यावर शब्दरूपी मारा केला. अर्थात हाडा मासांच्या शरीरावर एवढे प्रेम? एवढेच प्रेम श्रीराम यांच्यावर केले तर तुझे जीवन श्रेष्ठ ठरले असते, या शब्दात रत्नावलीने पती तुलसीदास यांना सुनावले. पत्नीच्या शब्दांनी त्यांचे आयुष्यच पालटले. या दोह्याचा त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम झाला. भौतिक सुखाचा त्याग करून ते अध्यात्माकडे वळले.

(कुलपती, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर)

(शब्दांकन : राजेश प्रायकर)

अभूतपूर्व कलाकृतीची निर्मिती

संत तुलसीदास यांनी वाल्मीकी रामायण वाचले. ते संस्कृतमध्ये असल्याने केवळ पांडित्यांमध्ये बंदिस्त होते. त्यामुळे प्रभू श्रीराम यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अवधी भाषेत ‘रामचरित मानस’ लिहिले. ‘रामचरित मानस’मागे पत्नी रत्नावलीची प्रेरणा होती. हा ग्रंथ म्हणजे सांस्कृतिक चैतन्य पसरविणारा अभूतपूर्व ग्रंथ आहे.

जीवनपद्धतीचे विवेचन

‘रामचरित मानस’ केवळ धार्मिक ग्रंथ नाही. ते जीवनपद्धतीचे विवेचन आहे. संत तुलसीदास यांनी यात तीन स्थळे घेतली. अयोध्या, जनकपुरी व श्रीलंका. अयोध्येत ईश्वराचे अवतरण झाले. त्यामुळे ते दहधारीनगर, जनकपुरीत वैदेही अर्थात सीतेचा जन्म झाला. येथे देह असूनही श्रीराम देहाचे भान विसरले. त्यामुळे ते विदेहनगर तर श्रीलंका म्हणजे भौतिक सुखाचा कळस. त्यामुळे ते देहनगर. हे त्रिगुणात्मक विवेचन समाजातील प्रतिकेच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com