

Why Do We Celebrate Tukaram Maharaj Beej
sakal
Sant Tukaram Beej Explained: महाराष्ट्रातील भक्तिपरंपरेतील अनेक संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज. महाराष्ट्राला लाभलेल्या अभंग संस्कृतीचे जनक. त्यांच्या अभंगांमध्ये विठोबाच्या भक्तीचा गूढ आणि गहन प्रवाह आहे. एवढंच नाही, तर तुकोबारायांच्या अभंगांमधून सामाजिक सुधारणांचा संदेशही स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतो.
‘आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा’ असं म्हणत संत तुकाराम महाराज वैकुंठात गेले. त्या दिवशी फाल्गुन कृष्ण द्वितीयेची तिथी होती. त्यामुळे दरवर्षी या तिथीला ‘तुकाराम बीज’ साजरी केली जाते. यंदा ही तिथी आज म्हणजेच ५ मार्चला आली आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी आणि संपूर्ण भक्तिभावाने फुलणार आहे.