

Sarva Pitri Amavasya 2026: Date, Shradh Muhurat, and Rituals
esakal
Sarva Pitri Amavasya 2026: हिंदू धर्मशास्त्रामध्ये पितृपक्ष पंधरवड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या या पंधरवड्याची सांगता 'सर्वपित्री अमावस्येला' होते. या तिथीला 'महालय अमावस्या' (Mahalaya Amavasya) असेही म्हंटले जाते. पितृपक्षातील हा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस मानला जातो, ज्या दिवशी संपूर्ण श्रद्धाभावाने सर्व पूर्वजांना अन् पितरांना निरोप दिला जातो.
ज्या लोकांना आपल्या पूर्वजांची किंवा मृत नातेवाईकांची नेमकी पुण्यतिथी माहिती नसते, त्यांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केले जाते. यामुळे सर्वपित्री अमावस्येला धार्मिक दृष्टीने विशेष स्थान प्राप्त झाले आहे.