Sawai Gandharva Sangeet Mahotsav : सवाई गंधर्व महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर

कोरोनामुळे सतत रद्द होणारा संगीत प्रेमींचा लाडका सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यंदा १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
sawai gandharva mahotsav
sawai gandharva mahotsav esakal

Sawai Gandharva Bhimsen Sangeet Mahotsav Artist List : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सतत रद्द होणारा संगीत प्रेमींचा लाडका सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यंदा १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे. महोत्सवाचं हे ६८ वं वर्ष आहे. मागील वर्षी स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष होते. पण कोविडमुळे त्यावेळीही हा महोत्सव रद्द झाल्याने संगीत रसिकांचा मोठा हिरमोड झाला होता. पण यंदा या दिव्य संगीताचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. कलाकारांची यादी पंडितजींचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

यंदा दि. १४ रोजी दुपारी ४ वाजता महोत्सवाची सुरूवात होईल.

पहिल्या दिवसाचे कलाकार

  • पं. उपेंद्र भट (गायन)

  • शाश्वती मंडल (गायन)

  • रत्तनमोहन शर्मा (गायन)

  • उस्ताद अमजद अली खान (सरोद वादन)

दिवस दुसरा १५ डिसेंबर २०२२ दुपारी ४ वाजता

  • अविनाश कुमार (गायन)

  • अलाम खान (सरोद)

  • पं. साजन मिश्रा (गायन)

  • श्रीमती एन राजम, संगीता शंकर, रागिणी शंकर आणि नंदिनी शंकर यांचे व्हायोलीन वादन

तिसरा दिवस १६ डिसेंबर २०२२ दुपारी ४ वाजता

  • मनाली बोस (गायन)

  • राहुल शर्मा (संतूर)

  • श्रीनिवास जोशी (गायन)

  • पं. अजय चक्रबोर्ती (गायन)

चौथा दिवस १७ डिसेंबर २०२२ दुपारी ४ वाजता

  • यशस्वी सरपोतदार (गायन)

  • पं. उमाकांत गुंदेचा (धृपद गायन)

  • भारती प्रताप (गायन)

  • विराज जाशी (गायन)

  • सिड श्रीराम (कर्नाटकी गायन)

  • उस्ताद रशिद खान (गायन) आणि उस्ताद शाहिद परवेज (सितार) सहवादन

शेवटचा दिवस १८ डिसेंबर २०२२ दुपारी ४ वाजता

  • आनंद भाटे (गायन)

  • राजेंद्र प्रसन्न (बासरी वादन)

  • राजेंद्र कंदलगावकर (गायन)

  • महेश काळे (हिंदूस्थानी संगीत गायन) आणि संदीप नारायण (कर्नाटकी गायन) जुगलबंदी

  • अर्चना जोगळेकर (नृत्य)

  • डॉ. प्रभा अत्रे (गायन)

दर वर्षी शनिवार रविवार २-२ सत्रात होणारा महोत्सव यंदा एकेक सत्रातच होणार आहे.

स्थळ - महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रमंडळ क्रीडा मैदानावर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com