Shani Dev: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आज विशेष योग; 'या' राशीत आहे 'गजकेसरी योग' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shani dev

Shani Dev: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आज विशेष योग; 'या' राशीत आहे 'गजकेसरी योग'

मकर राशि मध्ये प्रवेश केल्यानंतर शनिदेव उत्तम मनस्थितीत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनि वक्री होते तेव्हा शनिचा शुभ प्रभाव कमी होतो आणि शनिची चाल हळू होते. पौराणिक कथेनुसार शनिच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांची वक्री म्हणजे उलट चालमध्ये त्यांना त्रास होतो. मात्र 23 ऑक्टोबर 2022 नंतर शनिदेव मार्गी लागले असून त्यांचीच रास 'मकर' (Capricorn) मध्ये गोचर करत आहेत.

शनिचे हे परिवर्तन खूप महत्वपूर्ण मानले जातात. यानंतर शनिचे सर्वात मोठे परिवर्तन 2023 मध्ये पाहायला मिळतील. पंचांगच्या अनुसार 17 जानेवारी 2023 ला शनि कुंभ राशि (Aquarius)मध्ये प्रवेश करणार आहे..

हेही वाचा: Shani Dev: ‘या’ पाच राशींवर शनि पडणार भारी

शनि देवाची प्रिय राशी तुला आहे. तुला राशीवर शनि सर्वात जास्त प्रसन्न होतात. शनि कर्मफलदाता आहे म्हणजेच कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे शनिदेव तुमच्यावर नाराज होणार.

हेही वाचा: Shani Dev: ‘या’ खास लोकांवर राहते शनिदेवाची कृपा

आज या राशीत गजकेसरी योग

हिंदू कॅलेंडरनुसार 5 नोव्हेंबर 2022 ला शनिवार म्हणजेच आज शनिचा दिवस आहे. या दिवशी ग्रहांची विशेष स्थिति दिसत आहे. आज शनिदेवाची जो कोणी पुजा करतो त्यांना विशेष फळ प्राप्त होतं.

पंचांगनुसार आज कार्तिक महिन्याचा शुक्ल पक्ष द्वादशी तिथि आहे. या दिवशी उत्तराभाद्रपद नक्षत्र आहे. सोबतच विशेष म्हणजे या दिवशी मीन राशिमध्ये चंद्रमाचा गोचर होत आहे. जिथे देवांचे गुरू म्हणजेच बृहस्पति सर्वात आधी विराजमान होणार.

ज्योतिष प्रमाणिक ग्रंथांनुसार जेव्हा चंद्रमा आणि बृहस्पति यांची युति बनते तेव्हा हा अति उत्तम आणि शुभ योग असतो. यालाच गजकेसरी योग म्हणतात. म्हणजेच शनिवारला मीन राशी मध्ये गजकेसरी योग आहे.

हेही वाचा: Shani Dev: आज 'या' तीन राशींचे भाग्य शनि चमकवणार

आज शनि प्रदोष आहे. आज सायंकाळी 5 वाजून 9 मिनटांपर्यंत द्वादशीची तिथि असणार. यानंतर त्रयोदशीची तिथि सुरू होणार. आज प्रदोष व्रत ठेवला जाणार. ज्या दिवशी शनिवारला त्रयोदशीची तिथि येते तेव्हा शनि प्रदोष असतो.

त्रयोदशीची तिथिला भगवान शिवची पूजा करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार त्रयोदशीमध्ये प्रदोष काळ आल्याने शिवची पूजा करणे आणि जल वाहल्याने शिव प्रसन्न होणार.