Shani Jayanti 2022 : 'या' सात वाहनांवर बसून शनिदेव देतात शुभ-अशुभ फळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shani Jayanti 2022

Shani Jayanti 2022 : 'या' सात वाहनांवर बसून शनिदेव देतात शुभ-अशुभ फळ

यंदा शनि जयंती ३० मे म्हणजे सोमवारी आहे. शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात न्यायाधीश म्हटले गेले आहे. याचा अर्थ मनुष्याला त्याचे चांगले-वाईट कर्मांचे फळ शनिदेवच देतात. शनि चालीसात शनिदेवाच्या वाहनांविषयी सांगितले गेले आहे. त्यानुसार शनिदेवाचे सात वाहने आहेत. त्या व्यतिरिक्त शनिदेवाचे काही इतर वाहने ग्रंथांमध्येही सांगितले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित प्रफुल्ल भट म्हणतात, शनिदेव ज्या वाहनावर बसून एखाद्या राशीत जातात, तेव्हा त्यानुसार त्या राशीच्या लोकांना शुभ-अशुभ फळ प्राप्त होते. पुढे जाणून घ्या शनिदेवाचे वाहने कोण-कोणते आहेत...

वाहन प्रभू के सात सुजाना | दिग्गज, गर्दभ, मृग, अरुस्वाना ||

जम्बुक, सिंह आादी नखधारी | सो फल ज्योतिष कहत पुकारी ||

अर्थ - शनिदेवाचे सात वाहने आहेत. ती अशी हत्ती, गर्दभ, हरिण, श्वान, कोल्हा, सिंह आणि गिधाड. या व्यतिरिक्त कावळाही त्यांचे वाहन आहे.

हेही वाचा: आता शनिदेव पावणार, ती साडेसाती सरली

१. ज्योतिषशास्त्र अनुसार, जेव्हा शनिदेव हत्तीवर बसून कोणाच्या राशीत गेल्यास त्याला पैसा आणि मान-सन्मान मिळतो.

२. जेव्हा शनिदेव गर्दभावर बसून कोणाच्या राशीत प्रवेश करतात तर त्या राशीच्या लोकांचे होत असलेल्या कामांमध्ये अडथळा येतो. धनाच्या हानीला सामोरे जावे लागते.

३. शनि जेव्हा सिंहावर बसून कोणाच्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्या राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान आणि एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता असते.

४. शनिदेव कोल्ह्यावर बसून कोणाच्या राशीत प्रवेश करतात त्या राशीतील लोकांची बुद्धी भ्रष्ट होते. पैसे व सन्मानही जातो.

५. जेव्हा शनिदेव हरणावर बसतात, तेव्हा मरण यातना भोगावे लागतात. म्हणजे वाईट स्थितीशी सामना करावा लागतो.

६. श्वान हे खंडोबाचे वाहन आहे. मात्र जेव्हा शनिदेव श्वानावर बसून कोणाच्या राशीत जातात, तर त्याला धन लाभ होऊ शकते.

७. शनिदेव जेव्हा गिधाडावर बसून कोणाच्या राशीत जातात त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या व्याधी जडतात.

८. कावळ्यावर बसून शनिदेव व्यक्तीचे सर्व दुःख दूर करतात आणि रोगांपासून मुक्ती देतात.

Web Title: Shani Jayanti 2022 Know About Seven Vehicles Of Shani Dev

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top