'या' राशींना शनिजयंती देणार विशेष फळ; करा 'हा' उपाय

शनि जयंतीला सुमारे ३० वर्षांनी ग्रहांचा हा योग होत आहे त्यामुळे ही जयंती विशेष असणार आहे.
Shani Jayanti 2022
Shani Jayanti 2022Sakal

Shani Jayanti 2022: शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जात. त्याला कर्माचं फळ देणारा देवही म्हणतात. ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात असा सर्वाचा समज आहे. पण जर शनिदेव एखाद्यावर नाराज झाला तर तेवढीच कठोर शिक्षा त्याला मिळते. त्याचबरोबर ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते अशा लोकांना शनिदेव खूप भरभरून देतो असं म्हणतात. तसंच शनिदेवाच्या जयंतीला पूजापाठ केल्यामुळे शनिदेव लगेच प्रसन्न होतो असं म्हणतात.

यावर्षी शनिदेव शनिजयंतीला कुंभ राशीत विराजमान आहेत. शनि जयंतीला सुमारे ३० वर्षांनी ग्रहांचा हा योग होत आहे. यासोबतच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत असून वट सावित्री व्रत, सोमवती अमावस्याही याच दिवशी आहे. दरम्यान हिंदू पंचांगानुसार शनी जयंती दरवर्षी जेष्ठ महिन्यातल्या अमावस्येला साजरी केली जाते. शनिजयंतीचा यावर्षीचा मुहूर्त हा २९ मे ला दुपारी २ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होत असून ३० मे ला ४ वाजून ५९ मिनिटांनी संपणार आहे.

Shani Jayanti 2022
राणा अन् राष्ट्रवादी आमनेसामने; एकाच मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण

कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सध्या शनी काहीसा साथ देत नाही. यावेळी कुंभ, मकर आणि मीन राशीवर शनिची साडेसाती चालू आहे. अशा परिस्थितीत या 5 राशींसाठी ही शनिजयंती खूप खास असणार आहे. त्यामुळे ही रास असलेल्या लोकांनी शनिदेवाची मनोभावे पूजा केल्यास त्यांना शुभ फळ प्राप्त होते. तसेच जो व्यक्ती या दिवशी शनिदेवाची पूजा करतो त्याच्यावर शनिदेवाची वाईट दृष्टीही नसते असं सांगितलं जातं.

कशी करावी पूजा

  • शनि जयंतीच्या दिवशी भगवान शिवाला काळ्या तीळ मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा. असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते.

  • शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला अपराजिताच्या फुलांची माळ अर्पण करावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.

  • शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरीब आणि गरजूंना त्यांच्या क्षमतेनुसार दान करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com