वैदिक ज्योतिषानुसार शनी ही न्यायाची देवता मानली जाते. आपल्या कर्मांचे फळ ही देवता देत असते. सर्व ग्रहांमध्ये शनीची चाल सर्वांत संथ असते आणि यामुळे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो.
यंदा २९ मार्च रोजी शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला होता. यानंतर काही दिवसांतच, म्हणजे २८ एप्रिल रोजी शनीने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला. आता शनी याच नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे.